साक्षी मेहंदळेच्या प्रतिकृतीची राज्यस्तरावर निवड

0
10

अर्जुनी मोरगाव,दि.०४ः गोंदिया जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन सडक अर्जुनी येथे पार पडले.त्या प्रदर्शनात प्राथमिक गटातून ईसापूर ईटखेडा हायस्कुल ईटखेडा येथील विद्यार्थिनी साक्षी आनंदराव मेहंदळे हिच्या शास्वत विकासासाठी नाविन्यपुर्ण उपक्रम या प्रतिकृतीची निवड राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाकरीता झाली आहे.ती ईयत्ता ७ वी ची विद्यार्थीनी आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातंर्गत एच एंड टी ज्युनियर कॉलेज सडक अर्जुनी येथे तिनदिवसीय जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षिक पद्मजा उध्दव मेहंदळे यांच्या मार्गदर्शनात साक्षी ने प्रतिकृती तयार केली होती.या प्रतिकृतीची राज्यस्तरावर निवड झाली असून शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे,जि.प.सदस्या सरिता कापगते,शिक्षण विस्तार अधिकारी महेंद्र मोटघरे,विज्ञान पर्यवेक्षक यशवंत लंजे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन साक्षीचा सत्कार करण्यात आला.या निवडीचे श्रेय साक्षीने मुख्याध्यापक बी.एस.झोडे व शिक्षिका पद्मजा मेहंदळे यांना दिले आहे.