सर्वप्रथम लोकांच्या डोक्यामध्ये शौचालय बांधा – इस्ताफे

0
6

आकाश पडघन
वाशिम-दि.०४ः संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ अंर्तगत श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर जिल्ह्यातील ग्राम सावरगांव (जिरे) येथे सुरू असून स्वच्छता व आरोग्य उपक्रमामध्ये शौचालयाचे बांधकाम व नियमित वापर या विषयीची जनजागृती स्वंयसेवकांमार्फत करण्यात येत आहे. शिवाय श्रमदानातून ग्रामस्थाना शौषखड्डे खोदून देण्याचे कार्य स्वंयसेवक करित आहेत.रस्त्याची झाडझुड,उघड्यावर शौचास जावू नये म्हणून गुडमार्नीग पथकाचे कार्य विद्यार्थी करत आहेत. या शिबिराला जि.प. वाशिमच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी इस्ताफे यांनी भेट देत कार्याचा आढावा घेवून स्वयसेवक व पथकाचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्याना  ग्रामस्थाच्या डोक्यात प्रथम शौचालय बांधा  हा मंत्र रुजविण्याचा सल्ला स्वंयसेवकाना दिला. यावेळी राष्ट्रसंताचे विचार व सद्यास्थिती यावर प्रा.केशव गोरे यांनी मार्गदर्शन केले. श्री अंबेकर यांनी स्वंयसेवकानी स्वच्छता कार्य कसे करावे यावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला पोलिस पाटील काशिराम तडस उपस्थीत होते.