‘प्रोग्रेसिव्ह’च्या चित्रकला स्पध्रेत विद्यार्थ्यांनी भरले रंग

0
10

गोंदिया,दि.19ः-श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था, गोंदियाद्वारा संचालिक प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालयतर्फे स्थानिक सुभाष गार्डनमध्ये भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. चित्रकला स्पर्धेमध्ये प्रोग्रेसिव्ह ग्रुप ऑफ शाळेचे सर्व विद्यार्थी तसेच संपूर्ण गोंदियाच्या शाळेतील विद्यार्थ्यांर्नी आपल्या चित्राच्या माध्यमातून उत्कृष्ट कला दर्शवली.
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी व दंडाधिकारी अनंत वालस्कर होते. यावेळी एपीआय संजय सिंग, माजी जि.प. अध्यक्ष विनोद अग्रवाल, भावना कदम, मुरलीधर माहोरे, अश्‍विनी केंद्रे, सुनील केलनका, डॉ. टी.एम. ढेकवार, पंकज कटकवार, डॉ. नीरज कटकवार, पद्मा कटकवार, प्राचार्य अभय गुरव आदी उपस्थित होते.
चित्रकला स्पर्धेत ए गटात प्रथम क्रमांक जय अग्रवाल, द्वितीय ध्रुवेश पडोले, तृतीय र्शुती ठाकरे, बी गटामध्ये प्रथम क्रमांक उदय मेर्शाम, द्वितीय खुशाल ब्राह्मणकर, तृतीय हर्ष बोपचे, सी गटामध्ये प्रथम क्रमांक रिया लिचडे, द्वितीय तनिश्का अग्रवाल, तृतीय खुशी टेंभरे, डी गटामध्ये प्रथम क्रमांक सायली कटरे, द्वितीय तोषी दुबे, तृतीय जयश्री लिल्हारे तसेच ई गटामध्ये प्रथम मुकुंद पारधी, द्वितीय वैभव मेश्राम तर तृतीय क्रमांक बानेवार यांनी पटकाविले. मान्यवरांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणार्‍यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. आयोजनासाठी प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, अभय गुरव, कुमुदिनी तावाडे, कुलदीप भौती आदींनी परिश्रम घेतले.