‘प्रोग्रेसिव्ह’शाळेचे विद्यार्थ्यांची राज्य चित्रकला स्पध्रेसाठी निवड

0
3

गोंदिया,दि.७ ः-येथील श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेव्दारे संचालित प्रोग्रेसिव्ह ग्रुप ऑफ स्कूलच्या विद्यार्थ्यांची मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्सेस, रिव्हर डेव्हलपमेंट अँंड गंगा रिज्यूवनेशनव्दारे आयोजित आठव्या राष्ट्रीय चित्रकला स्पध्रेत राज्यपातळीवर निवड झाली आहे.
‘पाण्याचा उपयोग सावधपणे करा, येणार्‍या पिढीला वाचवा’ असा स्पध्रेचा विषय होता. शाळेचा रजा आबिद अली सय्यद, अक्षदा मुन्नालाल नागपुरे,हितेन मनोजकुमार गिडवानी, पल्लवी ओमप्रकाश कुथे, वेदश्री प्रकाश निर्विकार हे विद्यार्थी नागपूर येथे आयोजित राज्यस्तरीय स्पध्रेत सहभागी होणार आहे.
या विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ. पंकज कटकवार, सचिव डॉ. निरज कटकवार, प्राचार्य ओ.टी.रहांगडाले, कुमुदिनी तावाडे, विना कावळे, अभय गुरव, आशा राव, कृष्णा चव्हाण, निधी व्यास, मिनाक्षी महापात्रा, विकास पटले, प्रमोद वाडी,शिल्पा सिंग, कल्याणी रहांगडाले, वर्षा सतदेवे, तोमेश पारधी, रूपकला रहांगडाले, सिमरन बास्के, सुरेख बघेल, भूवन मेर्शाम, भारती गाढवे, गुरूदास भेलावे, कन्हय्या आंबाडारे तसेच शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले.