आरटीईच्या पहिल्या फेरीत ७०० विद्यार्थ्यांना प्रवेश

0
6

गोंदिया,दि.15 : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकारी अधिनियम-२००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायमविना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद आहे. जिल्ह्यातील १०२९ विद्यार्थ्यांना आरटीई २५ टक्क्यात मोफत प्रवेश मिळावा यासाठी २ हजार ११२ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज केले होते.पहिली सोडत १२ मार्च रोजी काढण्यात आली. त्या सोडतीतील ७०० विद्यार्थ्यांची निवड पहिल्या फेरीत करण्यात आली आहे.
सत्र २०१७-१८ मध्ये अर्ज आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील १३७ शाळांनी बालकांना प्रवेश देण्याकरिता शाळांची नोंदणी केली आहे. १३७ शाळांमधील १०२९ जागेकरिता २ हजार ११२ पालकांनी आॅनलाईन प्रवेश नोंदणी केली होती. घरापासून शाळेचे अंतर एक किमीच्या आत असलेल्या ७०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. १३७ शाळांपैकी १२२ शाळांमधील रिक्त असलेल्या ९४८ जागांसाठी ही पहिली सोडत काढण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीत निवड झाली किंवा ज्यांची निवड झाली नाही अश्या सर्व पालकांना त्यांच्या मोबाईलवर संदेश पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील १०२९ विद्यार्थ्यांना आरटीई २५ टक्क्यात मोफत प्रवेश मिळावा १२ मार्च रोजी पहिला ड्रा करण्यात आला. यात ७०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना प्रवेश करण्याची मुदत २४ मार्च पर्यंत देण्यात आली आहे. त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवा यासाठी २५ मार्च नंतर दुसरी सोडत काढण्यात येणार आहे.