आमगाव खुर्दचे विद्यार्थीही उपोषणावर

0
8

सालेकसा,दि.15 : आमगाव खुर्द ग्राम पंंचायतला सालेकसा नगर पंचायतमध्ये समाविष्ट करावे, म्हणून आमगावखुर्दचे नागरिक मागील २७ फेब्रुवारीपासून साखळी उपोषणावर बसले आहेत. १६ व्या दिवशी आमगाव खुर्दचे विद्यार्थी सुध्दा साखळी उपोषणावर बसून गावकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचा संकल्प दाखविला. किशोरवयीन विद्यार्थ्याच्या सहभागामुळे आंदोलनाला आणखी बळ मिळत आहे. तर दुसरीकडे १६ दिवस लोटून सुध्दा शासन प्रशासनाच्या वतीने कोणतेही प्रतिसाद मिळत नाही.
आमगाव खुर्द ग्राम पंचायतच्या संपूर्ण भाग तालुका मुख्यालयाच्या परिसरात आहे. परंतु सालेकसा तालुक्याच्या नावाने चालणारी सर्व कार्यालये आणि बाजारपेठ आमगाव खुर्दच्या हद्दीत आहेत.या राजकीय, गैरराजकीय, दुकानदार, महिला, पुरुष, विद्यार्थी, व्यापारी, ठेकेदार सर्वच वर्ग या आंदोलनात उतले आहेत. या आंदोलनाला आज (दि.१४) ला १६ दिवस सुरू झाला आहे. या आंदोलनात किशोरवयीन विद्यार्थ्यानी उपोषणात भाग घेतला आहे. यामध्ये मंगेश चुटे, सौरभ सोनवाने, दीपक बहेकार, अटलसिंह भाटीया, आदित्य दोनोडे, शुभम शहारे, शैलेश शेंडे, जितेंद्र दमाहे, गोल्डी भाटीया, स्वप्नील बोम्बार्डे, नवीन श्रीवास्तव, स्वप्नील करवाडे, नवीन श्रीवास्तव, रुपेश मसराम आदींचा समावेश आहे.