व्हॅलेंटाईनदिनी देवरीकरांची अमर शहीदांना अनोखी श्रद्धांजली

0
17

सुमारे ९६० जणांनी केला रक्तदान

देवरी- व्हॅलेंटाइन दिन. प्रेयसी-प्रियकराला इंप्रेस करण्याचा दिवस. घरून लपतछपत आपल्या जिवाभावाच्या प्रियकराला अज्ञात स्थळी भेटून काहीतरी अनोखी भेट देत प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. मात्र आदिवासी, अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील तरुणाईने एक वेगळा अध्याय लिहिला. केवळ युवकांनीच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा आपल्या सुरक्षेसाठी आपल्या जिवाचे आहुती देणाèया हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्याचा बेत आखला. आणि या शहींदांच्या बलिदानाची आठवण ताजी करताना चक्क रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
देवरी पोलिस उपमुख्यालयाच्या परिसरात आज व्हॅलेंटाइन दिनाचे औचित्य साधत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देवरी आणि सडक अर्जूनी तालुक्यातील युवक, पोलिस जवान आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून अनोखा विक्रम स्थापित केला. या शिबिरात सुमारे ९६० जणांनी रक्तदान केले. यावेळी देवरी येथील पोलिस उपविभागीय अधिकारी गजानन राजमाने आणि आमगावचे पोलिस उपविभागीय अधिकारी अजय देवरे हे प्रामुख्याने हजर होते. हे रक्तदान शिबिर गोंदिया येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालय आणि भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त संक्रमण विभागाच्या अधिकाèयांच्या देखरेखीत आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात गोळा करण्यात आलेले रक्त हे सिकलसेल रुग्ण आणि प्रसुतीरुग्णांसाठी उपयोगात आणले जाणार असल्याचे गंगाबाई रुग्णालयातील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले.