मॉडेल कॉन्व्हेंट गोरेगावचा निकाल १०० टक्के

0
12

गोरेगाव,दि.०८ः-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी परिक्षेचा निकाल जाहिर झाला.त्यात गोरेगाव येथील मॉडेल कान्व्हेंटचा निकाल १०० टक्के लागला असून पुष्पक टेंभरे यांनी ८७.८० टक्के अंक घेऊन प्रथम क्रमांक पटकावला.त्याचप्रमाणे शिवम पटले ८६.८० टक्के व पुलकित टेंभरे यांनी ८५.२० टक्के घेऊन अनुक्रम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.कान्व्हेंटमधील सर्वच विद्यार्थी प्राविण्य यादीत आले आहेत.या सर्व विद्याथ्र्यांचे संस्थापक आर.डी.कटरे,सौ.सुरेखा कटरे,मुख्याध्यापिका छाया मेश्राम,रामेश्वर काबंळे यांच्यासह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.येथीलच मासुम तुरकर ८४.६०,सुभाषचंद्र चौरागडे ८४.४०,शितल पारधी ८९.६०,यश तुरकर ८३.२०,अमोल पटले ८२.४०,आयुष डोंगरे ८२.४० व दिक्षा चाचेरे हिने ८२.२० टक्के अंक मिळवून यश प्राप्त केले.