गडचिरोली पोलीस दलातर्फे पोलीस कल्याण सप्ताह उत्साहात साजरा

0
8

गडचिरोली,दि.08(अशोक दुर्गम) : पोलीस दलातर्फे 1 ते 7 जून दरम्यान पोलीस कल्याण सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहानिमित्याने पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये महिलांसाठी रांगोळी स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा यासोबत मनोरंजनासाठी संगीतखुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महिलांसाठी योगा शिबीराचे आयोजन करण्यात आले .वर्षा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडाभर योग शिबिर चालविण्यात आले. यामध्ये महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.या सप्ताह दरम्यान संमर कॅम्पचे आयोजन करण्यात आले.

त्यात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा 120 पाल्यांनी सहभाग नोंदविला.स्वछता मोहीम सुद्धा राबविण्यात आले.त्याच बरोबर पोलिसांना विविध योजनामर्फत मिळणाऱ्या अनुदानाचे वाटप पोलीस अधीक्षकांच्या हस्ते करण्यात आले.या सप्ताहात राबविण्यात आलेल्या रक्तदान व रोगनिदान शिबिरास पोलीस कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.या शिबिरात 306 जणांनी लाभ घेतला असून विविध वैद्यकीय अधिकाऱ्यांची साथ मिळाली.70 जणांनी रक्तदान केले.डाॅ.सोनाली देशमुख,डाॅ.मिलिंद रामटेके,डाॅ.नंदु मेश्राम,डाॅ.हेमंत कामडी,डाॅ.राकेश चांदेकर,डाॅ.रीना मेश्राम,राहुल कंकनवार यांनी आरोग्य तपासणीच्यावेळी सहकार्य केले. या सप्ताह मध्ये पोलीस कल्याण निधी अंतर्गत राबविलेल्या योजना आणि उपक्रमावरील माहिती पुस्तिकेचे 2000 प्रती तसेच पोलीस कल्याण योजनेमार्फत विविध अनुदानाची माहिती चे पत्रके 4000 प्रति  व पोलीस कल्याण योजना माहीती असलेले 75 बॅनर्स तयार करून सर्व उपविभाग व पोलीस स्टेशन,मदत केंद्रातील अधिकारी व कर्मचर्याना वाटप करण्यात आले.एकंदरीत गडचिरोली पोलीस दलातर्फे साजरा करण्यात आलेला पोलीस कल्याण सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला.पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनात  पोलीस कल्याण निधी विभागाचे यशवंत नलावडे व नरेंद्र पवार यांनी काम बघितले.