शिक्षक परिषदेचे सोमवारी मुंबईत आंदोलन

0
14

गोंदिया-गेल्या अनेक वर्षापासून प्रलqबत असलेल्या अनेक मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने येत्या सोमवारी १६ मार्च रोजी मुंबई येथील आज्ञाद मैदानावर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागपूर विभागीय अध्यक्ष उल्हास फ़डके यांनी दिली.या आंदोलनात गोंदिया जिल्ह्यातून सुमारे २०० च्या वर शिक्षक सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.फडके यांनी सांगितले की,जिल्हा परिषद शिक्षणविभागाच्या वेतनपथकातील कर्मचारी रिक्त पदे भरण्यात यावे.नक्षलग्रस्त भत्ता लागू करण्यात यावा.एकस्तर वेतनश्रेणी लागू करणे,जिल्हा परिषद,खासगी,आश्रमशाळेतील शिक्षकांचे वेतन १ तारखेला करण्यात यावे.जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावे.अनुदान पात्र तुकड्या,पात्र शाळाना अनुदान देण्यात यावे.जुनीच पेंशन योजना लागू करणे,प्राथमिक शाळेत शिक्षकेतर कर्मचारी पद निर्माण करणे.शाळा तेथे ग्रंथालय सुरू करून ग्रंथपाल पद निर्माण करणे.केद्रशासनामार्फेण महिलांना बालसंगोपन व पुरुषांना पितृत्व रजा मंजूर करण्यात यावी.एमसीव्हीसी शिक्षक,निदेश,कर्मचारी नियमित करण्यासाठी शालार्थ योजना लागू करण्यात यावे या मागण्यासांठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे सांगितले.यावेळी सतीश मंत्री,अंगेश बेहलपांडे,सुरेश गारोडे,भुमेश्वर फुं‹डे,सी.एस.बिसेन,टेंभरे,अरुण पारधी,शेषराव बिजवार,दीपक गोखले,योगेश बन यांच्यासह इतर शिक्षक उपस्थित होते.