तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेत माॅडेल काॅन्व्हेंटचे सुयश

0
14

गोरेगाव,दि.01ः- येथील तहसिल कार्यालयाच्या पटागंणावर प्रजासत्ताक दिनी पार पडलेल्या तालुकास्तरीय सामूहिक नृत्य स्पर्धेत मॉडेल कॉन्व्हेंट गोरेगावच्या के जी 1 के जी 2 च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर अप्रतिम लेझीम डान्स सादर करुन प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या यशाबद्दल विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व स्मृती चिन्ह प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. शाळेतील संस्थापक तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.