विद्यार्थ्यांनी घेतला व्यसनमुक्तीचा संकल्प

0
16

अहेरी,दि.१३ः-तालुक्यातील १६ शाळांमध्ये व्यसनमुक्त संकल्प शाळा उपक्रमांतर्गत मुक्तिदिन कार्यक्रम घेण्यात आला. यात २ हजार ७९८ विद्यार्थ्यांनी सहभागी होत कधीही खर्रा आणि तंबाखूजन्य पदार्थ खाणार नसल्याचा संकल्प केला.
तालुक्यातील शासकीय माध्यमिक आर्शमशाळा गुड्डीगुडम येथील २१९, राजे धर्मराव हायस्कूल वेलगूर १३0, जि. प. उच्च प्राथमिक शाळा छल्लेवाडा ९३, भगवंतराव माध्यमिक आर्शमशाळा २४२, जि. प. उच्च प्रा. शाळा रेवनपल्ली २२, संत मानवदयाल हायस्कूल अहेरी १५0, शासकीय माध्यमिक आर्शमशाळा ९४, जि. प. उच्च प्राथमिक शाळा मरपल्ली २८, मॉडेल हायस्कूल अहेरी १३९, जि. प. केंद्र शाळा राजाराम(खा) ५९, भगवंतराव आर्शमशाळा काटेपल्ली १३0, राजे धर्मराव हायस्कूल आलापल्ली ३00, कस्तुरबा गांधी विद्यालय इंदाराम १४0, भगवंतराव हायस्कूल इंदाराम १६0, राजे धर्मराव हायस्कूल व्यंकटरावपेठा १३0, राणी दुर्गावती मुलींची शाळा आलापल्ली येथील ७६२ अशा एकूण २ हजार ७९८ विद्यार्थ्यांनी खर्रा न खाण्याचा निर्धार करीत व्यसनमुक्त शाळेचा संकल्प केला.