23.7 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home शैक्षणिक २४ मार्च रोजी १४ उपकेंद्रांवर होणार परीक्षा

२४ मार्च रोजी १४ उपकेंद्रांवर होणार परीक्षा

0
46

वाशिम, दि. 20 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित गट-ब) पूर्व परीक्षा- २०१९  रविवार, २४ मार्च २०१९ रोजी सकाळी १० वा. ते दुपारी १२ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. वाशिम शहरातील राजस्थान महाविद्यालय, माउंट कारमेल हायस्कूल,  श्री शिवाजी हायस्कूल, श्री तुळशीराम जाधव महाविद्यालय, सन्मती इंजिनिअरींग कॉलेज, हॅपी फेसेस हायस्कूल-१, हॅपी फेसेस हायस्कूल-२, एसएमसी इंग्लिश स्कूल, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, श्री बाकलीवाल विद्यालय, श्री. बालाजी अध्यापक महाविद्यालय, शासकीय तंत्र निकेतन, रेखाताई राष्ट्रीय कन्या शाळा व जवाहर नवोदय विद्यालय या चौदा उपकेंद्रांवर ही परीक्षा होत आहे. या सर्व परीक्षा उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

सर्व परीक्षा उपकेंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्यामुळे परीक्षा उपकेंद्रांवर ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही. उपकेंद्राच्या १०० मीटर परिक्षेत्रात केंद्राधिकारी, पर्यवेक्षक, समवेक्षक, सहाय्यक कर्मचारी, परीक्षार्थी, परीक्षेसाठी नियुक्त समन्वय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडून नियुक्त केलेले अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेशास मनाई राहील. उपकेंद्रावर १०० मीटरचे आत रस्त्यावरून वाहन नेण्यास मनाई राहील. परीक्षा उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी., आय.एस.डी., झेरॉक्स, फॅक्स, ई-मेल, ध्वनीक्षेपक, इंटरनेट इत्यादी सुविधांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. परीक्षा उपकेंद्रावर मोबाईल फोन, वायरलेस सेट, रेडीओ, दूरदर्शन, कॅल्क्युलेटर, कॉम्प्यूटर वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. परीक्षा उपकेंद्रावर एकाचवेळी चारपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही. हा आदेश २४ मार्च २०१९ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत कायम राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.