प्रोग्रेसिव्ह सीबीएसई दहावीचा निकाल शंभर टक्के

0
8

गोंदिया,दि.07ः-सीबीएसई बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल  ६ मे रोजी जाहीर झाला. यात येथील श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेव्दारे संचालित प्रोग्रेसिव्ह सीबीएसई शाळेने १00 टक्के निकाल दिला आहे.
शाळेतून प्रथम चौधरी याने ९७ टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला. तर उत्कर्ष चव्हाण व अनूर बोहरे यांनी ९६ टक्के गुण घेत व्दितीय व विदीता येरणे हिने ९५.४0 टक्के गुण घेत अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. शाळेतील २९ विद्यार्थ्यांनी ९0 टक्क्यापेक्षा गुण मिळविले असून यात, निशांत मेर्शाम, पलक वर्मा, नकुल कोरे, मोहित चव्हाण, गुणांगी भगत, ओम भालेराव, राधा रहांगडाले, तनया झंझाड, तेजस ठवकर, प्रेमा बघेले, पवन कटरे, रितीका रोकडे, अनुष्का यादव, आदित्य शर्मा, मनिष बिसेन, मयूर मोहारे, समिक्षा गुप्ता, तोषिनी कोडापे, अर्जुन वर्मा, इशा रामटेके, मानसी गिरी, माधवी काठेवार, साक्षी खांडेकर, यश टेंभरे, सायली कटरे, मोहित चावला यांचा समावेश आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. पंकज कटकवार, सचिव डॉ. निरज कटकवार, सहसचिव पद्मा कटकवार, कोषाध्यक्ष ज्योती पहिरे, मुख्याध्यापक ओ. टी. रहांगडाले तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे.