24 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home शैक्षणिक निबंध स्पर्धेत प्रोगेसिव्ह शाळेचे सुयश

निबंध स्पर्धेत प्रोगेसिव्ह शाळेचे सुयश

0
32

गोंदिया,दि.25 : प्रोग्रेसिव्ह शाळेच्या प्रतिभावान विद्यार्थ्यांना भारतीय नवयुवक छात्रोधान संस्था, गोंदिया द्वारा संचालित स्व. मनोहरभाई पटेल यांच्या स्मृति प्रित्यर्थ निबंध लेखन स्पध्रेचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा प्रोग्रेसिव्ह शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला. या निबंध स्पध्रेत आपल्या सुंदर व सुवाक्ष अक्षरामध्ये आपले मनोगत प्रकट केले. यात प्रोग्रेसिव्ह शाळेतील रीना होमेंद्र सिंगनजुडे प्रथम तर चंद्राली संजय वैद्य प्रोत्साहन पुरस्कार प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांना रनिंग शील्ड व स्मृती चिन्ह देवून सम्मानित करण्यात आले. आयोजकांनी प्रोग्रेसिव्ह शाळेच्या सर्व अध्यापकवर्गांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा श्रेय संस्था अध्यक्ष डॉ. पंकज कटकवार, सचिव डॉ. निरज कटकवार व सर्व मार्गदर्शक शिक्षकांना दिले. प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, ज्योती पहिरे, कुमुदिनी तवाडे, वाय.आशा राव, मिनाक्षी महापात्रा, अभय गुरव, निधी व्यास, वर्षा सतदेवे, विणा कावळे, कृष्णा चौहान, प्रमोद वाडी, विकास पटले, तुमेश पारधी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

blank