गोरेगाव,दि.17:-स्थानीक किरसान इंटरनॅशनल पब्लिक स्कूल येथे संस्थापक डॉ. एन. डी. किरसान, याच्या प्रमुख उपस्थितीत ग्रीन दिवस व हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आले.यावेळी ग्रीन दिवसाचे महत्व व भाषेची ओळख शिक्षणात, व्यापारात, समन्व्य साधण्यासाठी असल्याचे सांगितले. भाषेशिवाय प्रगती साधता येत नाहीत असे यावेळी डॉ. किरसान विदयार्थ्यांना मार्गदर्शन करते वेळी सांगितले.तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा ग्रीन कलर मध्ये पोषक घालून हिरव्या रंगाचे महत्व दिसून येते होते. या वेळी शाळेचे प्राचार्या रुपाली मेहता, नगमा पठाण, छाया चुलपार, सीमा चंद्रिकापुरे, देवेस्वारी राणे, शुभागी वऱ्हाडे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर उपस्थित होते.




