25.1 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home शैक्षणिक तालुकानिहाय वेतन निश्चिती कॅम्प लावून जीपीएफ ऑनलाईन करा

तालुकानिहाय वेतन निश्चिती कॅम्प लावून जीपीएफ ऑनलाईन करा

0
69

गोंदिया,दि.19 : जिल्हा परिषद गोंदिया येथे शिक्षक समस्या संदर्भात शिक्षक समितीच्या पदाधिकार्यांनी शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे व मुख्य लेखा व वित्त अधिकारी मसराम यांच्याशी चर्चा केली असता तात्काळ समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तर्फे शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांना भेटून विज्ञान विषय शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी व सोबतच २०१६ ला नियुक्त झालेल्या विषय शिक्षक यांनी शासन निर्णय व इतर जिल्ह्याप्रमाणे पदवीधर वेतनश्रेणी लावण्याची मागणी केली असता शिक्षणाधिकाNयांनी सहमती दर्शवत तात्काळ विषय शिक्षकांना न्याय देवून रिक्त जागा भरण्याचे आश्वासन दिले. डीसीपीएस (नगदी) जीपीएफ बांधवांचा पहिला हप्ता तात्काळ वित्त विभागाला पाठविण्याची
मागणी केली असता यावर संबंधित लिपीक कुळसाम मॅडम यांनी पाच तालुक्यातील देयक कोषागार विभागात गेले  असल्याचे सांगितले व उर्वरित तीन तालुके लवकरच वित्त विभागात पाठविले जाणार असल्याचे सांगितले. माहे ऑक्चोबरचे वेतन व सण अग्रीम देयक १५ ऑक्टोबर पर्यत होण्याच्या दृष्टीने ५ ऑक्टोबर पर्यत वेतन बिल मागविणे संदर्भात कार्यवाही करण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी दिले. तसेच जीपीएफ ऑनलाईन करणे, तालुकानिहाय वेतन निश्चितीचे कॅम्प घेणे, निवडश्रेणी/चटोपाध्याय प्रकरणे काढणे, जीपीएफ/डीसीपीएस चा हिसोब परिक्षा परवानगी कार्याेत्तर परिक्षा परवानगी स्थायी आदेश हिंदी मराठी सूर आदी प्रश्नांसाठी मुख्य लेखावित्त अधिकारी यांचेशी चर्चा केली असता तात्काळ सर्व मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. चर्चेत राज्य कार्यकारिणी कार्यकारिणी सदस्य किशोर डोंगरवार, जिल्हा सहसचिव संदीप तिडके, जूनी पेंशन हक्क संघटनेचे सचिव हुमेंद्र चांदेवार, मधुसूदन शेंडे, एकनाथ लंजे,भाष्कर मुंगमोडे, रोहित हत्तीमारे, राहुल कोतमवार, भूमेश बडोले, सचिन इलमकर, स्मिता मच्छिरके उपस्थित होते.

उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्याला नावलौकिक मिळवून दिला. परंतु त्याच जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सुटतांना दिसत नाही. जीपीएफ च्या नोंदी चार चार वर्ष न होणे, सेवानिवृत्ती प्रकरण थांबवून ठेवणे, सडक अर्जुनीचे जीपीएफ अपहार प्रकरण या सारख्या अनेक समस्या जैसे थे अशाच आहेत. त्यामुळे शिक्षकांतअसंतोष निर्माण होत आहे.त्यामुळे शिक्षकांत असंतोष निर्माण होत आहे. त्यामुळे या जवाबदार जि.प. चे धोरण असून समस्या तात्काळ मार्गी लावाव्यात अन्यथा समितीच्या वतीने भव्य आंदोलन उभारले जाईल असा इशारा किशोर डोंगरवार यांनी दिला आहे.