गोंदिया,दि.18ःस्थानिक प्रोग्रेसिव्ह ग्रुप ऑफ स्कूल्स मध्ये भारतरत्न तसेच माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्म दिवसानिमित्त वाचन दिवस आणि जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात आले.
संस्थेच्या विभिन्न माध्यमांच्या वर्ग १ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी विभिन्न प्रकारच्या पुस्तकांचे वाचन व अवलोकन केले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या विषयात इंग्रेजी, हिंदी, मराठी संस्कृती पुस्तकांचे सखोल वाचन केले. त्याचप्रकारे सर्व शालेय विद्यार्थ्यांना जागतिक हात धुवा दिवस शाळेत साजरा केले. या प्रसंगी हात धुण्याचे महत्व पटवून देत संस्थाध्यक्ष डॉ. पंकज कटकवार तसेच डॉ. निरज कटकवार यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की कशाप्रकारे आपण हात स्वच्छ करून निटनिराळय़ा रोगांपासून मुक्त राहू शकतो. तसेच त्यावर आधारित डाक्युमेटरी चित्रपट दाखवून विद्यार्थ्यांना जागरूक केले व दुसर्या रोगांपासून मुक्त राहू शकतो. तसेच त्यावर आधारित डाक्युमेटरी चित्रपट दाखवून विद्यार्थ्यांना जागरूक करून डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी संक्षिप्त माहिती दिली.
कार्यक्रमाला यशस्वी बनविण्यासाठी प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, कुमुदिनी तावाडे, वाय.आशा राव, मिनाक्षी महापात्रा, अभय गुरव, विणा कावळे, कृष्ण चौहान, निधी व्यास, वर्षा सतदेवे, प्रमोद वाडी, विकास पटले, रूपकला रहांगडाले, तोमेश पारधी तथा राहुल रामटेके, दिव्यांशु जैस्वाल व समस्त अध्यापक वर्गांनी सहकार्य केले.




