गोंदिया,दि.13ः-महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना समिती गोंदियाची जिल्हास्तरीय सहविचार सभा व सत्कार सोहळा (दि.१२) गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था गोंदिया येथे पार पडला.गोंदियाचे नवनिर्वाचित आमदार विनोद अग्रवाल यांचा सत्कार करुन त्यांना निवेदन सादर करण्यात आले.त्यानंतर झालेल्या सभेत जिल्ह्यातील प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी भुमिका ठरवणे.गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था गोंदिया व जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी पतसंस्था गोंदिया यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात तिव्रता आणण्यासाठी संघटनात्मक लढा देणे. राज्य आदर्श पुरस्कार(२०१९) प्राप्त शिक्षक व जिल्हा व तालुका पदाधिकारी सेवानिवृत्त शिक्षक (३१/१०/२०१९ पर्यंत)यांचा सत्कार करणे. सावित्रीबाई फुले जयंती सोहळा महिला मंचाच्या माध्यमातून साजरा करणे. स्व.खे.मंडळ गोंदिया बरखास्त करून निवडणूक घेणे. आंतरजिल्हा बदली एक वेतनवाढ मंत्रालयीन लढा उभारणे. राज्य आदर्श पुरस्कार व जिल्हा आदर्श पुरस्कार २००७ ते २०१८ यांचा न्यायालयीन लढा उभारणे.सर्व तालुक्यांत शाखेचे गठन करणे. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांच्या हुकूमशाही विरूद्ध निषेध ठराव मंजूर करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी राजानंद वैद्य जिल्हा अध्यक्ष हे होते.यावेळी प्राजक्ता रणदिवे महिला अध्यक्ष,नेतराम बिजेवार जिल्हा नेते,रघुपती अगडे जिल्हा सरचिटणीस केंद्र प्रमुख संघटना,जयश्री सिरसाटे महिला सरचिटणीस,हरिराम येळणे जिल्हा सरचिटणीस उपस्थित होते.संचालन उत्तम टेंभरे,रेखा बिसेन यांनी केले.पी.जी.साकुरे,मनोहर सुर्यवंशी,दिक्षा फुलझेले,बावणकर सर,कलावती कोल्हटकर,शामराव चन्ने यांचा सत्कार करण्यात आला.





