23.8 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ जिल्ह्यातील ६ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली बाल लैंगिक अत्याचार विरोधी जनजागृती मोहीम

जिल्ह्यातील ६ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली बाल लैंगिक अत्याचार विरोधी जनजागृती मोहीम

0
33

वाशिमदि. २२ : गेल्या काही वर्षापासून बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने ९ ते २२ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत विधी सेवा पंधरवाडा अंतर्गत बाल लैंगिक अत्याचार विरोधी जनजागृती मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे २५ शाळा, वसतिगृह शाळामधील सुमारे ६ हजार विद्यार्थांची जनजागृती करण्यात आली. तसेच त्यांना पोक्सो कायद्याअंतर्गत कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले. विधी स्वयंसेवक व विधिज्ञ या मोहिमेत सहभागी झाले होते. राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा येथे या मोहिमेचा समारोप करण्यात आला.यावेळी वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे, ॲड. जी. व्ही. मोरे, ॲड. डी. आर. पडघान, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेच्या मुख्याध्यापक स्वाती कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. देशपांडे म्हणाले, बाल अपराध करणारा अपराधी हा बऱ्याचदा परिचयाचा, नात्यातलाच व्यक्ती असतो. केवळ भीती अभावी किंवा दडपणा अभावी आपण त्याची तक्रार करायाला घाबरतो. अशा पीडित व्यक्तीला दाद मागण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सवैद पाठीशी आहे. बाल लैंगिक अत्याचार विरोधी जनजागृती हा कार्यक्रम लहान वयातील मुलांसाठी नवीन आणि काहीसा अवघड वाटला तरी याची आजच्या काळात अत्यंत गरजेचा आहे, असे त्यांनी सांगितले.

ॲड. मोरे यांनी मुलींनी खंबीरपणे अन्यायाचा प्रतिकार व तक्रार केली पाहिजे, असे सांगितले. तर ॲड. पडघान यांनी गरिबी, निरक्षरता, कामासाठी स्थलांतर व मोबाईल यांचा दुष्परिणाम यामुळे लहान मुले लैंगिक अपराधाला सहज बळी पडत आहेत, असे सांगितले. मुख्याध्यापक सौ. कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले.विधी सेवकांनी भाषणे, पथनाट्य याच्या साह्याने सतत १५ दिवस जनजागृती केली, याबद्दल त्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

blank