गोंदिया,दि.२६- जिल्हा वकील संघाच्यावतीने संविधान दिवस साजरा करण्यात आला.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन संविधानाची शपथ घेण्यात आली.यावेळी उपाध्यक्ष अॅड कृष्णा पारधी,सचिव अॅड.सचिन बोरकर,वसंत चुटे,अॅड सचिन बनसोड,देवेंद्र नागपूरे,राजु लांजेवार,अखिल श्रीवास्तव,अजय भेंडारकर,विवेक धुर्वे,राहुल बोरकर.डी.जे.वंजारी,लंकेश चौरे,अरुन वैद्य,अंजनी चौहान,मिना भोवते,सरिता मेश्राम,रोशनी पटले,देवी मिश्रा,विकास कराडे,दर्शना रामटेके,प्रज्ञा डोंगरे,वैशाली उके,रमाशंकार राय,योगेश मानकर,प्रशांत रोकडे,देवेंद्र पारधी,सुशील यादव आदी उपस्थित होते.
मोहाडी येथील ग्रामपंचायत मध्ये सqवधान दिवस
गोरेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत मोहाडी येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला.अध्यक्षस्थानी सरपंच रजनीताई धपाडे होत्या.यावेळी उपसरंपच प्रभु बघेले,जी.एम.बघेले,चेतना वाकणे,प्रिती धपाडे,ग्रामसेवक पी.बी.टेंभरे यांच्यासह राजकुमार पटले आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी संविधानाचे वाचन करण्यात आले.ग्रा.प.कर्मचारी टोलीराम भोयरसह नागरीक उपस्थित होते.
जिल्हा न्यायालयात संविधान वाचन
गोंदिया येथील जिल्हा सत्र न्यायालयात संविधानाचे वाचन करण्यात आले.यावेळी एस.बी.पराते,जिल्हा न्यायाधीश ए.जी.जोशी,एन.आर.वानखेडे सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तसेच न्यायाधीश जे.एम. चव्हाण,आर.डी.पुनसे,व्ही.आर.आसुदानी,व्ही. आर.मालुडे,पी.सी.बघेले,एड.टी.बी.कटरे,कोर्ट वकील संघाचे सर्व वकील,कर्मचारी उपस्थित होते.
संविधान अर्पण दिनाचे अवचित साधून आज साकरीटोला येथे संपूर्ण विद्याथ्र्यांच्या वतीने श्री विद्या गल्स हायस्कूल,बॅरी.राजाभाऊ कॉलेज,जिल्हा परिषद हायस्कूल व प्रायमरी शाळा सकरीटोलाच्यावतीने गावकèयांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम राबविण्यात आला.त्या प्रसंगी मनोज शरणागत,प्रा.अजया चुटे,प्रा.भडादे,प्रा.काटेखाये,प्रा.मेश्राम,शहारे मॅडम,प्रा.दखणे,डॉ.अजय उमाठे,डॉ.देशमुख,उषाताई मेंढे,मेश्राम यांच्यासह संपुर्ण शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
किरसान मिशन मध्ये संविधान दिवस
गोरेगाव-स्थानिक किरसान मिशन स्कूल व जुनिअर कॉलेज गोरेगाव इथे संविधान दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्षता स्थानी संस्थापक डॉ. नामदेवजी किरसान, होते. संविधान समाज, राष्ट्र आणि समुदाय साठी एक लिखित कायदा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विस्तृत संशोधन करून राष्ट्राला अर्पण केले. संविधानामुळे लोकांना त्याचे मूलभूत व इतर अधीकार मिळाले असून संविधानाचे पालन व टिकवून ठेवण्याची जबाबदारी हि जनतेचे आहे. असे डॉ. किरसान यांनी व्यक्त केले. यावेळी प्राचार्य डॉ.विनोद उके, गीता जगणित, छाया हरिणखेडे, मीरा साठवणे, मंगला जांभूळकर,माधुरी बघेले, ममता चौधरी, पुष्पलता सोनवणे, सुनील रहांगडाले, माधुरी गोदुले, ज्ञानेश्वरी पटले, गोदावरी डोहळे, प्रमोद रहांगडाले, लक्ष्मी चौरसिया, सुभाष चुलपार, धर्मन्द्र राऊत व सचिन रामटेके उपस्थित होते.




