सहावी ते बारावीच्या पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना

0
21

पुणे दि. 6:: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एमएससीआरटी) इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेचे व विकसनाचे काम सुरू करण्यात आले असून, शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांकडून अभ्यासक्रमाबाबत सूचना मागविण्यात आल्या आहेत. तसेच, तज्ज्ञ व्यक्तींना विविध अभ्यास मंडळावर घेतले जाणार आहे.

बदलत्या शैक्षणिक प्रवाहानुसार राज्यातील अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला आहे. त्यासाठी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सहभाग अपेक्षित आहे. शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणक्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांमधील प्रतिनिधींचा या कार्यामध्ये समावेश करून घेतला जाणार आहे. येत्या 10 मे पर्यंत शिक्षण विभागाकडे याबाबत नावनोंदणी करता येणार आहे.