अर्जुनी मोर,दि.02–तालुक्यातील पिंपळगाव/खांबी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत कार्यरत उच्चश्रेणी मुख्याध्यापक हिरालाल लांडगे यांचा सेवानवृत्त सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच उर्मिला मेश्राम होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ईश्वरदास ऊके, उपाध्यक्ष माधुरी ब्राम्हणकर, पंसचे गटसमनव्यक सत्यवान शहारे, केंद्रप्रमुख बी. एम. ब्राम्हणकर, मुख्याध्यापक व्ही. डी. शहारे, ग्रापं सदस्य गोमा ब्राम्हणकर, पौर्णिमा ब्राम्हणकर, योगिता भिमटे माजी ग्रापं सदस्य महेंद्र मेश्राम आदी उपस्थित होते.
या प्रसंगी हिरालाल लांडगे व त्यांच्या पत्नी छाया लांडगे यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सरपंच उर्मिला मेश्राम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती हिरालाल लांडगे यांनी आपले अनुभव व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन शाळेला भेटवस्तू दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए. आर. शहारे यांनी केले.संचालन किर्तीवर्धन मेर्शाम यांनी केले तर आभार विलास भैसारे यांनी मानले.





