विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदभरती 14 व 15 सप्टेंबरला मुलाखती

0
137

गोंदिया,दि.30 : जिल्हाधिकारी कार्यालयाने 3 फेब्रुवारी 2021 ला प्रसिध्द केलेल्या जाहिरातीनुसार 11
विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ताची पदे भरण्याकरीता इच्छुक उमेदवारांनी 62 अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात
सादर केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे गठीत समितीद्वारे 62 अर्जांची/उमेदवारांची छाननी करुन पात्र/अपात्र
यादी तयार करण्यात आली. पहिल्या छाननीत 36 अर्जदार मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आले आणि उर्वरित 26
अर्जदार अपात्र ठरविण्यात आले.
त्यानंतर अपात्र उमेदवारांकडून आक्षेप अर्ज मागविण्यात आले. एकूण 7 आक्षेप अर्ज प्राप्त झाले. अर्ज छाननी
समितीने 3 ऑगस्ट 2021 रोजी सर्व प्राप्त 7 आक्षेप अर्जांची छाननी केली. मात्र त्यांना पात्र ठरविता येत नाही असे
अभिप्राय दिले आहे.
पात्र उमेदवारांची 14 व 15 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे
मुलाखत घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी नियोजित तारखेला सर्व मूळ दस्ताऐवजांसह न चुकता उपस्थित
राहावे. नियोजित वेळेस उपस्थित न राहिल्यास किंवा उशिरा उपस्थित झाल्यास त्यांचा फेरविचार केला जाणार
नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
पुर्वी प्रसिध्द करण्यात आलेल्या पात्र उमेदवारांची यादी अनुक्रमांक 1 ते 18 पर्यंत 14 सप्टेंबर रोजी सकाळी
10 वाजता. तसेच अनुक्रमांक 19 ते 36 पर्यंत 15 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता मुलाखत सुरु होईल.
राजेश्वरी दिनेश सहारे, मनिष अशोक नेवारे, सौरभ मनिमोहन विश्वास, देवेश्वरी राधेश्याम मिश्रा, अश्विन
प्रभुदास गेडाम, ज्योती प्रभाकर भरणे, राधिका रमेश बगडे असे एकूण 7 उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले
आहे. असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी जयराम देशपांडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.