जालना-मेहकर रोडवर 3 वाहनांमध्ये विचित्र अपघात

0
24

मेहकर-भरधाव वेगाने जाणार्‍या 3 वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला. यामध्ये अ‍ॅपे चालकासह तीन ते चार प्रवासी जखमी झाले. हि घटना 28 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता जालना ते मेहकर रोडवर घडली. मेहकर कडून एमएच 20 ईएल 6531 बोलेरो पिकप जालनाकडे जात होते. तर बिबी गावातून येणारी एमएच 28 एझेड 5565 क्रमांकाची कार महामार्गाकडे येत होती. तर पिकपच्या पाठीमागून अ‍ॅपे रिक्षा येत होता.राज्य महामार्ग जवळ येताच बोलेरो पिकअपने कारला जबर धडक दिली.
चालकाने ब्रेक दाबताच पाठीमागून मलकापूर पांगराकडे जाणारा अ‍ॅपे रिक्षा पिकअपवर येऊन धडकला. यात अ‍ॅपे चालकासह तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी झाले. पिकअपच्या धडकेत स्विफ्ट डिझायर कारच्या एअर बॅग ओपन झाल्या. त्यामुळे कारमधील कोणीही जखमी झाले नाही व कार रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. पिकअप चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे हे वाहन विरुद्ध दिशेला फिरल्यामुळे मागून येणार्‍या ऑटोला पिकअपचा धक्का लागल्याने ऑटो पलटी झाला. अपघात घडताच बिबी पोलीस स्टेशनचे कर्मचारी व येथील ग्रामस्थांनी जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले.