सैन्यभरतीची तारीख ठरली, तरुणांनो तयारीला लागा..

0
15

नागपूर : सैन्यदल भरती नागपूर कार्यालयाने वेगवेगळ्या पदांसाठी अग्निवीर भरतीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर केला. जनरल ड्युटी, तांत्रिक आणि लिपिक पदासाठी १० जून २०२३ पासून नागपुरात भरती मेळावा होत आहे. पहिल्या फेरीत पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी २५ ते १७ जून २०२३ दरम्यान घेतली जाईल.विदर्भांतील (बुलडाणा जिल्हा वगळून) पात्र पुरुष उमेदवारांसाठी सैन्य भरती मेळावा विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर,नागपूर येथे १० जून २०२३ ते १७ जून २०२३ या कालावधीत आयोजित केला जाईल. हा मेळावा आर्मी रिक्रूटिंग ऑफिस, नागपूर आयोजित करीत आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी निवडलेल्या उमेदवारांसाठी प्रवेशपत्रे संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहेत. उमेदवारांना त्यांच्या वैयक्तिक आयडी लॉगिनद्वारे त्यांना डाउनलोड करता येईल.