तिरोडा:- सिंचन विकासाबरोबरच तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्यामार्फत तिरोडा येथे भव्य नोकरी महोत्सव आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात पुणे, नागपूर, औरंगाबाद,नागपूर व स्थानीक अशा एकूण ४२ कंपन्यांचे प्रमुख मुलाखतीकरीता उपलब्ध करण्यात आले होते.सदर नोकरी महोत्सवामध्ये तिरोडा, गोरेगाव व गोंदिया तालुक्यातील १५०० सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मुलाखत दिली असून केले असून १८४ युवकांना कंपन्यांमध्ये सामील होण्याचे पत्र सुधा कंपनीकडून देण्यात आले आहे सदर कार्यक्रमाची सुरुवात तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रामुख्याने मा. नगराध्यक्षा सोनाली देशपांडे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ओम कटरे, जी.प.सदस्य चत्रभूज बिसेन, पवन पटले, ऍड.माधुरी रहांगडाले, प.स.उपसभापती हुपराज जमाईवार, भाजप शहरअध्यक्ष स्वानंद पारधी,महिला मोर्चा शहरअध्यक्ष राणी बालकोठे, युवा मोर्चा शहरअध्यक्ष अमोल तीतीरमारे, सरपंच प्रतिमा जैतवार, मीनाक्षी ठाकरे, मेघा बिसेन, मा.प्रशासक संजय बैस, शहर महामंत्री दिगंबर ढोक, प्रकाश सोनकावडे, सोशल मिडिया प्रमुख नितीन पराते, डीलेश पारधी, अनुप बोपचे, डॉ.संगीता भोयर, फर्स्ट फ्लाय कॉर्पोरेटचे डायरेक्टर निलेश शेलार, विविध ४२ कंपन्यांचे विभाग प्रमुख, एस.डी.बी.विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.