गोंदिया, दि.10: जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया व शासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया (Government Polytechnic, गोंदिया) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता शासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया येथे जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रोजगार मेळाव्यामध्ये 11 कंपन्यांचे उद्योजक सहभागी होणार असून 1453 रिक्त जागांवर भरती करणार आहेत. करीता ईच्छुक उमेदवारांनी या जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे.
इयत्ता 10 वी व 12 वी पास, आयटीआय, तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर अशा पात्रता असणाऱ्या बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्ण संधी आहे. उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची छायांकीत प्रमाणपत्रे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकत्ता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया या कार्यालयाचे नोंदणी कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया येथील दुरध्वनी क्रमांक 07182-299150 यावर किंवा [email protected] या इमेल आयडीवर संपर्क साधावा. या रोजगार मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया यांनी केले आहे.