34.7 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home रोजगार/व्यापार विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून आयोजित तंत्रप्रदर्शनीचे कौतुक-आमदार विनोद अग्रवाल

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून आयोजित तंत्रप्रदर्शनीचे कौतुक-आमदार विनोद अग्रवाल

0
43

blank

गोंदिया, दि.25 : विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून आयोजित तंत्रप्रदर्शनीचे कौतुक आमदार विनोद अग्रवाल यांनी केले. कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय क्षिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या वतीने 23 जानेवारी 2026 रोजी जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनीचे आयोजन महर्षि अरविंद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंदिया येथे करण्यात आले, त्यावेळी श्री. अग्रवाल उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.बी. गणवीर होते.

श्री. अग्रवाल म्हणाले, आयटीआयमध्ये शिकणारे विद्यार्थी कल्पक बुध्दीचे असून या तंत्रप्रदर्शनीमुळे त्यांच्या कल्पक बुध्दीला चालना मिळाली. भविष्यात हे विद्यार्थी त्यांनी निवडलेल्या करिअरमध्ये नक्कीच प्रगती करतील अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.श्री. गणवीर यांनी जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनीचे आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत म्हणाले, तंत्रशिक्षण हे आयुष्याच्या सर्वच टप्प्यावर हमखास रोजगार उपलब्ध करुन देणारे आहे.

या तंत्रप्रदर्शनीमध्ये जिल्हयातील सर्व तालुक्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतुन विविध मॉडेल्स तयार करुन आणले होते.कार्यक्रमास ग्रामपंचायत फुलचुर पेठ सरपंच उषा बावनकर, पोलिस पाटील फुलथुर पेठ मंगला तिडके, नवउषा गारमेंटचे व्यवस्थापक विजयकुमार चोपडा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोरेगाव प्राचार्य व्ही.बी. म्हात्रे, शासकीय आदिवासी औद्योगिक प्रशिक्षण सस्था बिजेपार प्रकल्प अधिकारी बी.के. सरनाईक उपस्थित होते.या प्रदर्शनीचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंदिया प्राचार्य बी.एन. तुमडाम व सर्व कर्मचारी वृंद यांच्यामार्फत करण्यात आले.