38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home रोजगार/व्यापार पोलीस शिपाई बॅन्डस्मन पदभरती लेखी परीक्षा शनिवारी

पोलीस शिपाई बॅन्डस्मन पदभरती लेखी परीक्षा शनिवारी

0
37

blank

*परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 163 लागु*

गोंदिया, दि.01 : गोंदिया जिल्ह्याचे आस्थापनेवर पोलीस शिपाई बॅन्डस्मन पदाकरीता घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमध्ये कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची दि.4 एप्रिल 2026 रोजी पोलीस मुख्यालय कारंजा (गोंदिया) येथे लेखी परीक्षा सकाळी 6 ते दुपारी 4 या वेळेत घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षा प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे दृष्टीने पोलीस मुख्यालय कारंजा येथे दि.4 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 ते दुपारी 4 या वेळेत भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी गोंदिया प्रजित नायर यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात परीक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान कोणासही कसल्याही प्रकारचे अस्त्र, शस्त्र व कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे उदा. कॅल्क्युलेटर, मोबाईल, लॅपटॉप, पेजर, फॅक्स मशीन, झेरॉक्स मशीन इत्यादींचा वापर किंवा जवळ बाळगण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

हा आदेश पोलीस भरती प्रक्रिया 2024-2025 करीता परीक्षेच्या कामावर नियुक्त असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना परीक्षा केंद्रावर प्रवेशासाठी लागु राहणार नाही. सदर आदेश दि.4 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी प्रजित नायर यांनी कळविले आहे.

blank