गोंडी कथासंग्रहाचे प्रकाशन

0
12

सालेकसा: आदिवासी साहित्य संशोधन प्रकल्पांतर्गत धनेगाव कचारगड येथे गोंडवाना दर्शन विषयाच्या ३0 व्या वर्धापनदिनानिमित्त ‘विरासत की आदिवासी गोंडी कहानिया’ या कथासंग्रहाचे प्रकाशन सोमवारी करण्यात आले. कार्यक्रमाला साहित्यिक माणिक गेडाम, युवराज गंगाराम, प्रा.वैजनाथ अनमुलवाड, लातूरचे अँड.रामराजे आत्राम, डॉ. विजय खंडाते, शंकरलाल मडावी, अर्चना सयाम, मणिराम दुग्गा, अंताराम पक्ष उपस्थित होते. कार्यक्रमासाठी लेखिका उषाकिरण आत्राम, प्रकल्प प्रमुख सुरेंद्रसिंह ताराम, विनय आत्राम, ज्योत्सना राजगडकर, राधेश्याम धुर्वे, मंजू चाकाटे यांनी सहकार्य केले. याप्रसंगी मोतीराम कंगाली यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.