प्रतापगड पहाडीने जपली ंिहंदू-मुस्लीम ऐक्यभावना

0
20

गोंदिया : प्रतापगड पहाडीवर महादेवाचे मंदिर व ख्वाजा उस्मान गनी चिश्ती यांची दरगाह आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी हिंदू-मुस्लीम एकत्र येऊन ‘हर हर महादेव’ चा गजर करीत या पहाडावर नतमस्तक होतात.

अनेक वर्षापासून या ठिकाणी यात्रा भरते. ४०० वर्षापूर्वी गोंड राजाच्या काळात ही एकात्मता दर्शविणारी पहाडी तयार करण्यात आली. दगडांना फोडून सुरक्षेच्या दृष्टीने या पहाडीला जमविण्यात आले. गोंड राजांवर रघुजी भोसले राजे यांनी आक्रमण करून विजय मिळविला. त्या नंतर त्यांच्या देखरेखीची जबाबदारी राजा खान यांच्या कडे सोपविली होती.

या पहाडीवर ख्वाजा उस्मान गनी यांचा दरगाह व उंच टेकडीवर चांदसावली यांचा किल्ला आहे. त्याच्याजवळ गुफा व सुरंग आहे. दगडांवर नक्षिकाम करण्यात आले आहे.

किल्याच्या आत विहीर, दगडांनी बनलेली कावड आहे. ती कावड राक्षसांची कावड असल्याच्या नावाने प्रसिध्द आहे. दगडांच्या मधात शिवलिंग, धान कुटण्याचे साहित्य, तलाव व घोड्याच्या तळव्याला असलेल्या टाचा त्या ठिकाणी आहेत. महादेव मंदिरात सीता नहानी, विशाल शिवमूर्ती, भवानी मंदिर आहे.

या ठिकाणी महाशिवरात्रीला दरवर्षी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन केले जाते. पहाडीच्या पायथ्याशी खटखटीया शाहाबाबा यांची दरगाह व पुरातन अशोक स्तंभ आहे. खा. नाना पटोले यांच्या मार्फत दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.