आमगाव खुर्द डिजीटल शाळेचे आयुक्तांच्या हस्ते उदघाटन

0
6

सालेकसा,दि. ६ :  सालेकसा तालुक्यातील आमगाव खुर्द येथील डिजीटल शाळेचे उदघाटन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी केले. यावेळी आयुक्तासमवेत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, अतिरीक्त मुख्‍य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, उपविभागीय अधिकारी सूनील सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी आर.टी. शिंदे, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, गटविकास अधिकारी श्री मोटघरे, सरपंच योगेश राऊत, गटशिक्षणाधिकारी वाय.सी.भोयर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भीमराव भास्कर, मुख्याध्यापिका श्रृती चॅटर्जी, सर्व शिक्षा अभियानाच्या जिल्हा समन्वयक बाळकृष्ण बिसेन यांची उपस्थिती होती. डिजीटल शाळेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची आधूनिक सुविधा उपलब्ध झाली असून ही शाळा डिजीटल करण्यासाठी आमगाव ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याची माहिती व या शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती मुख्याध्यापिका चॅटर्जी यांनी दिली.