युवकांनी साधनांचा सदुपयोग करावा -सविता पुराम

0
14

सालेकसा : युवा शक्तींनी आपला अमूल्य वेळ वाया न घालवता विविध साधनांचा सदुपयोग करण्यासाठी वापर करावा. वेळेची किमत समजून आपले करिअर घडविण्यासाठी व समाजहितासाठी आपली युवा शक्ती वापरावी, असे आवाहन जि.प.च्या माजी बालकल्याण सभापती सविता संजय पुराम यांनी केले.
नेहरू युवा केंद्र गोंदियाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मित्रमंडळ सालेकसाच्या सहकार्याने आदिवासी सांस्कृतिक भवन सालेकसा येथे पडोस युवा संसद कार्यक्रमात युवकांना विविध विषयावर मार्गदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सोमवारी १४ मार्चला घेण्यात आले. याप्रसंगी त्या मार्गदर्शन करीत होत्या.
उद््घाटन सविता संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. भगवान साखरे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. दिप्ती चौरागडे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा सहसमन्वय अखिलेश मिश्रा, पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम, प्रा. भूषण फुंडे, प्रा. प्रतिमा फुंडे, प्रा. अश्‍विन खांडेकर, विजय मानकर, गणेश भदाडे, रंजू टेकाम व इतर मान्यवर उपस्थित होते.संचालन पवन पाथोडे यांनी केले. आभार देवेंद्र फरदे यांनी मानले. प्रास्ताविक संगिता हत्तीमारे यांनी  केली. कार्यक्रमासाठी मनीषा कुतीर, विजय उईके, पृथ्वीराज हत्तीमारे, सरिता बिसेन, दिव्या भगत, पूजा डोंगरे, आरती बघेले, भारती बहेकार, हेमराज मेंढे, नीलेश दोनोडे आदींनी सहकार्य केले.