निशांतरॉय बोंबार्डे झी मराठी वाहिनीत

0
7

गोंदिया : गोंदिया येथील रहिवासी निशांतरॉय बोंबार्डे हा युवक झी मराठी या वाहिनीत मुंबई येथे कार्यरत असून त्यांच्या ‘दारवठा’ या मराठी चित्रपटाला पदार्पणातील सवरेत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडण्यात आले. सदर चित्रपटाची अमेरिकेतही निवड झाल्याने गोंदियाच्या गौरवात वाढ झाली आहे.
निशांतरॉय बोंबार्डे यांच्या दारवठा चित्रपटाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली असून सदर पुरस्कार ३ मे २0१६ रोजी राष्ट्रपती यांच्या हस्ते दिल्ली येथे देण्यात येणार आहे. निशांतरॉयचे वडील हेमंत बोंबार्डे व आई ललिता येथील श्रीनगरात ेराहतात.
चित्रपट नगरीतील पुरस्कार मिळालेला गोंदिया शहरातील निशांतरॉय हा पहिला युवक ठरला आहे. तसेच दारवठा चित्रपटाची अमेरिकेतील पुरस्कारासाठीही निवड झाली आहे. तो पुरस्कार एप्रिल महिन्यात देण्यात येणार आहे.