गोंदिया व भंडारा रेल्वे स्थानकाचा ‘आदर्श’ कायापालट

0
9

गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळांतर्गत येणाऱ्या गोंदिया व भंडारा रेल्वे स्थानकांना आदर्श स्थानकांच्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या स्थानकांवर अधिकाधिक प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

गोंदिया स्थानकास या श्रेणीत समावेश करण्यात आल्याने प्रवासी सुविधांमध्ये अतिरिक्त उन्नयनचे कार्य करण्यात येईल. त्या अंतर्गत प्लॅटफॉर्म-५ व ३ वर अतिरिक्त प्लॅटफॉर्म शेल्टरची व्यवस्था करण्यात येईल. अपंगांसाठी तीन प्रसाधनांची सोय, प्लॅटफॉर्म-५ मध्ये कोच इंडिकेटर बोर्ड, प्रथम व द्वितीय श्रेणीमध्ये महिला व पुरूषांसाठी उपलब्ध प्रसाधन गृहांचे नवीणीकरण करण्यात येईल. याशिवाय स्थानकात सर्व प्रकाश व्यवस्थेसाठी अतिरिक्त एलईडी लाईटची तरतूद व सर्व प्रतीक्षालयात टेलिव्हिजनची सोय करण्यात येणार आहे.

भंडारा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म-१ वर महिलांसाठी एका अतिरिक्त प्रसाधनाचे बांधकाम करण्यात येईल. तसेच अतिरिक्त ट्रेन इंडिकेटर बोर्डची व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांना गाड्यांची ये-जा ची माहिती मिळविणे सहज होईल. तसेच स्थानकात सर्वच ठिकाणी प्रकाश व्यवस्थेसाठी अतिरिक्त एलईडी लाईची तरतूद आहे.

प्लॅटफॉर्म-२ व ३ वर अतिरिक्त प्लॅटफॉर्म शेल्टरची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिवाय प्रतीक्षालयांमध्ये टेलिव्हिजनची सोय करण्यात येईल. ही माहिती देताना दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापकांनी नागपूर मंडळ प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी नेहमी तत्पर व कार्यरत राहील, असे म्हटले.