आ. पुरामच्या हस्ते मुख्यमंत्री मदतनिधीतून एक लाखाची मदत

0
16

सालेकसा : सोनपुरी येथील बावनकर कुटुंबातील एका महिलेवर मद्यमाशांनी हल्ला घेण्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला होता. तिच्या कुटुंबाला मुख्यमंत्री मदतनिधीतून एक लाखाची मदत देण्यात आली. तहसील कार्यालय सालेकसा येथे आ. संजय पुराम यांच्या हस्ते एक लाखाचे धनादेश महिलेच्या पतीला मुलासह प्रदान करण्यात आले. आ. संजय पुराम यांच्या प्रयत्नाने तिच्या कुटुंबाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदत निधीतून एक लाख रुपये मंजूर करण्यात आले. पुराम यांनी मदत स्वरुपात एक लाखाचा धनादेश तिच्याप्रती व मुलांच्या हाती प्रदान केला. या वेळी जि.प. समाजकल्याण सभापती देवराज वडगाये, भाजपचे ज्येष्ठ नेते राकेश शर्मा, तालुका अध्यक्ष परसराम फुंडे, बाबा लिल्हारे, राजेंद्र बडोले, बद्रीप्रसाद दसरीया, विनोद जैन, शंकर मडावी, इसराम बहेकार, तहसीलदार प्रशांत सांगळे, सविता पुराम व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मागील खरीप हंगामात सोनपुरी येथील बावनकर कुटुंबातील महिला पंचफुला धरमदास आपल्या शेतात धान निंदन करायला गेली होती. त्या परिसरातील एका झाडावर असलेल्या मधमाशांनी तिच्यावर हल्ला करुन चेहर्‍यासह शरीराच्या इतर भागात चावा घेतला होता. परिणामी दुसर्‍या दिवशी त्या महिलेचा दुदैवी मृत्यू झाला. तिच्या पीडित कुटुंबाला मदत मिळावी, अशी गावकर्‍यांची मागणी होती.