रावसाहेब दानवेंची उचलबांगडी ?केंद्रात रवानगी

0
7

मुंबई, दि. ६ – महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन रावसाहेब दानवे यांची उलबांगडी होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांकडून समजते. या महिन्यात होऊ घातलेल्या संभाव्य केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज रात्री मुंबईत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर आज रात्री ही बैठक होईल असे सांगण्यात आले. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे पुन्हा केंद्रात जाण्याचे संकेत मिळत आहेत. दानवे यांच्या कार्यशैलीबाबत अनेक जिल्ह्यातून तक्रारी आल्याने अमित शहांनी त्यांचे प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्याचे ठरवले आहे तसेच त्यांना केंद्रात राज्यमंत्रीपद मिळणार असल्याचे कळते आहे.

या बैठकीला भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पक्षाचे संघटनप्रमुख व्ही. सतिश, नुकताच राजीनामा दिलेले एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील यांच्यासह महत्त्वाचे नेते यात सहभागी होतील. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, राज्य मंत्रिमंडळ विस्तार, पक्षसंघटन व कार्यकारिणी, शिवसेनेच्या सत्तेवाटपातील सूत्र, मित्रपक्षांना संधी व एकनाथ खडसे यांच्याकडील मंत्रिपदाचे वाटप कशा पद्धतीने करायचे आदी मुद्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
फडणवीस सरकारचा विस्तार येत्या 15 जूनंनतर होणार असल्याचे कळते.