महिलांची कुटुंबातील भूमिका अर्थमंत्र्याची- डॉ.पुलकुंडवार

0
7

गोंदिया,दि.9 : कुटुंब व्यवस्थेत स्त्रीला महत्वाचे स्थान आहे. कुटुंबाच्या विविध गरजांचे नियोजन महिला करतात. त्यामुळे महिलांची कुटुंबातील भूमिका ही गृहमंत्र्याची नव्हे तर अर्थमंत्र्याची आहे, असे मत प्रभारी जिल्हाधिकारी तथा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केले.तिरोडा येथील झरारीया सभागृहात तेजस्वीनी राज्य ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तेजस्वीनी लोकसंचालित साधन केंद्र तिरोड्याच्या सातव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उदघाटक म्हणून डॉ.पुलकुंडवार बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तिरोडा पं.स.च्या सभापती आशा किंदरले, युनिसेफचे राज्य समन्वयक जयंत देशपांडे, युनिसेफच्या राज्य सल्लागार श्रीमती भारती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, माविमचे विभागीय मूल्यमापन अधिकारी केशव पवार, तेजस्वीनीच्या अध्यक्ष लिला बिसेन, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, सहायक समन्वय अधिकारी सतीश मार्कंड यांची प्रमुख उपस्थित होते.
तिरोडा येथील मार्केटिंक केंद्र बचतगटाच्या उत्पादित मालांची विक्री करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगून डॉ.पुलकुंडवार पुढे म्हणाले.श्री.देशमुख म्हणाले, कुटुंब व समाजाच्या प्रगतीसाठी बचतगट उपयुक्त आहे. महिलांचे जीवनमान उंचाविण्यासाठी बचतगटाची भूमिका महत्वाची आहे.यावेळी युनिसेफच्या सल्लागार श्रीमती भारती, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व माविमचे विभागीय मूल्यमापन अधिकारी केशव पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविकातून सोसे यांनी सांगितले की, जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाने ७ तालुक्यात विविध महिला बचतगटांची निर्मीती करुन ५८ हजार महिलांना सक्षम केले आहे.मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील रमाबाई आंबेडकर महिला बचतगट बेलाटी, माऊली महिला बचतगट करटी, तुलसी महिला बचतगट परसवाडा, आधार महिला बचतगट गांगला, ओक महिला बचतगट सातोना व दुर्गा महिला बचतगट मेंदीपूर या बचतगटांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते तेजस्वीनी लोकसंचालित साधन केंद्र तिरोडाच्या अहवाल पुस्तिकाचे सन २०१५-१६ चे विमोचन करण्यात आले.यशस्वीतेसाठी अनिता आदमने, शिल्पा येडे, प्रितम पारधी, विनोद राऊत, सारिका बंसोड, सुनिल पटले, चित्रा कावळे, रेखा रामटेके, निशा मेश्राम, लक्ष्मीप्रसाद बारापात्रे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन सविता तिडके यांनी केले. उपस्थितांचे आभार नंदेश्वरी बिसेन यांनी मानले.