रानडुकारच्या हल्यात दोघे जखमी

0
9

सडक-अर्जुनी,दि.9 : वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयातंर्गत येत असलेल्या शिकारीटोला व घटेगाव येथील दोघांना रानडुकराने हल्ला करून जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि.८) सायंकाळी ४वाजतादरम्यान घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शिकारीटोला येथील अविनाश फुलचंद मरस्कोल्हे (२४) हा बकर्‍या चारण्यासाठी जवळील जंगलात गेला होता.यावेळी रानडुकराने हल्ला केला. तर अर्धातासाच्या अंतरात घटेगाव येथील केशर भाऊचंद बिसेन (५0) ही शेतात काम करीत असताना रानडुकराने हल्ला केला.अविनाश व केशरवर हल्ला करणारा हा एकच रानडुकर असु शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिकारीटोला व घटेगाव या परिसराला लागुन जंगल असल्यामुळे नेहमीच वन्यप्राण्यांचा त्रास होत आहे.जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. सदर प्रकरणाची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी गोवर्धन राठौड, क्षेत्र सहायक कोहमाराचे सुनिल खांडेकर, कोसमतोंडीचे क्षेत्र सहायक जे.जे.खोब्रागडे, वनरक्षक रजनी रामटेके, पल्लवी वाढई, प्रियंका नंदागवळी यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.