32.5 C
Gondiā
Tuesday, June 23, 2026
Home Featured News मानकर गुरुजी जयंती समारोह शनिवारी

मानकर गुरुजी जयंती समारोह शनिवारी

0
35

आमगाव ,berartimes.com दि.2–: शिक्षणमहर्षी र्शद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती शनिवारी ४ रोजी दुपारी १२ वाजता भवभूति महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले कार्यक्रमाचे उद््घाटन करतील. याप्रसंगी उच्चशिक्षण नागपूर विभागाच्या सहसंचालिका डॉ. अंजली राहाटगावकर, संघाचे प्रांत प्रचारक प्रसाद महानकर, खासदार अशोक नेते. आमदार संजय पुराम, प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यावेळी आ. गिरीश व्यास, आ. परिणय फुके, तिरोड्याच्या नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, डॉ. गजानन डोंगरवार,नटवरलाल गांधी, नाना नाकाडे, भरत क्षत्रीय, चि.तु.पटले यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांना संघी टॉपर्स अवार्ड व भवभूति महाविद्यालयाच्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.समारोह कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.