कचारगड यात्रेकरूंसाठी वीज पुरवठा पहील्यांदाच सुरू होणार

0
5

गोंदिया,दि.३:- दरवर्षी जिल्हयातील कचारगड यात्रेसाठी येण-या भावीकांसाठी खुश खबर आहे. महावितरण गोंदिया परिमंडळ द्वारा महाराष्र्टं पर्यटन विकास विभाग यांच्या सहयोगाने कचारगड येथे ८ ते १२ फेब्रुवारी २०१७ दरम्यान सुरू होण-या वार्षीक यात्रेकरूंसाठी वीज पुरवठा पहील्यांदाच सुरू होणार आहे.
या ठिकाणी महावितरण द्वारा ४ किलोमिटर लांब एरियल बंच केबल टाकण्यात आली असुन यामुळे आता येणा-या यात्रेकरूसाठी वीजची सुविधा उपलब्ध् राहणार आहे.महाराष्र्टं पर्यटन विकास विभागाद्वारे यासाठी डी.वी. डी.सी. फंडातुन ४५.७३ लाख रूपयाची तरतुद आहे.