नागपूर महानगरपालिकेमध्ये स्नेहा निकोसे सर्वांत कमी वयाची नगरसेविका

0
6

नागपूर दि. २४ -: नागपूर महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक ९ मधील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार स्नेहा विवेक निकोसे या वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्या महापालिकेमध्ये महिलांमधून सर्वांत कमी वयाच्या नगरसेविका ठरल्या आहेत.प्रभाग ९ मधून तीन जागांवर बहुजन समाज पक्षाने विजय मिळविला. मात्र येथे स्नेहा निकोसे यांनी एका जागेवर विजय मिळवीत काँग्रेसची लाज राखली. त्यांनी विद्यमान नगरसेविका किरण पाटणकर यांना पराभूत केले.एकूण ७ हजार ९0६ मते मिळाली असून ३३८ मतांनी विजय मिळविला आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय पती विवेक निकोसे व परिवाराला दिले आहे. एम.ए. समाजशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या स्नेहा निकोसे यांना समाजकार्याची आवड होती.