बुलडाणा मराठी संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

0
18

नागपूर दि.१९: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, नागपूर आणि विदर्भ साहित्य संघाच्या बुलडाणा शाखेच्या वतीने श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, शेलसूर यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने बुलडाणा जिल्हा मराठी संमेलनाचे आयोजन २६ मार्च रोजी करवंड, ता. चिखली येथे करण्यात आले आहे. या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण बुलडाण्याचे अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
सुप्रसिद्ध सुलेखनकर गोपाल वाकोडे यांनी साकारलेल्याया बोधचिन्हातील लेखणी हे निर्मितीचे प्रतीक तर मोर हे सौंदर्य व कलेचे सूचक आहे. या दोघांचा संबंध साहित्य निर्मितीशी असून समाज जीवन हे त्याचे अधिष्ठान आहे, असा आशय यातून प्रतित होत असल्याचे शिवानंद टाकसाळे यावेळी म्हणाले. याप्रसंगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. सुनील देशमुख, वि.सा. संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य नरेंद्र लांजेवार, बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळे, स्त्रीमुक्ती संघटनेच्या डॉ. इंदूमती लहाने, शाहिना पठाण, कवयित्री सुवर्णा पावडे-कुळकर्णी, नाट्यकर्मी अनिल अंजनकर, ज्येष्ठ कवी सुदाम खरे, रणजित राजपूत, अरुण जैन, विवेक चांदूरकर, पंजाबराव गायकवाड, सुधीर देशमुख, प्रा. निशिकांत ढवळे, अजय दराखे, मिलिंद चिंचोळकर, प्रा. अनिल रिंढे, दीपक मोरे, विशाल पवार उपस्थित होते.