प्रा.देवरेंच्या ईव्हीएम या पुस्तिकेचे खा.यादव यांच्या हस्ते प्रकाशन

0
9

नवी दिल्ली,दि.३-महाराष्ट्रातील ओबीसी चळवळीचे खंदे समर्थक सत्यशोधक परिक्षा मंडळाचे प्रमुख प्रा.श्रावण देवरे यांच्या ईव्हीएम या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद यादव यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.या पुस्तकात ईव्हीएममध्ये होणारी गडबड आणि ओबीसी बहुजनांवरील अन्यायाचा खुलासा करण्यात आला आहे.यावेळी लेखक व ओबीसी नेते प्रा. श्रावण देवरे,सत्यशोधक समाजाचे सुनील सरदार, प्रा. दिलीप मंडल,श्रीमती यादव,सरिता सागर आदी उपस्थित होते.