गोंदिया व सालेकसा तालुकयात ५ ते १२ एप्रिल दरम्यान ग्रामसभा

0
14

गोंदिया,दि.३ : महसूल विभागाशी संबंधित असलेल्या प्रश्नांची सोडवूणक करण्यासाठी गोंदिया व सालेकसा तालुक्यातील सर्व गावात ५ ते १२ एप्रिल दरम्यान ग्रामसभांचे आयोजन सकाळी १० ते ६ दरम्यांन करण्यात आले आहे. या ग्रामसभेमध्ये वडीलांच्या मृत्यूनंतर मुले व मुली यांचे वारसहक्काने सातबारावर नाव नोंदविणे, वडील व मुले यांच्यामध्ये किंवा भावाभावामध्ये शेतजमिनीचे वाटणी करुन खाते फोड करणे. वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करणे जमिन जर सिंचनाखाली असेल आणि त्याची नोंद सातबारावर झाली नसेल अशा नोंदी अदयावत करणे. ज्या मुलीचे वारसाहक्काचे नोंदी सातबारावर झाली नसेल त्याची नोंद करुन घेणे १०० टक्के ऑनलाईन सातबारा वाटप होणे. लक्ष्मी मुक्ती योजना यशस्वीपणे राबविणे सोबतच शुन्य माता व बालमृत्यू व डासमुक्त गाव या विषयावर देखील चर्चा होऊन प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या ग्रामसभांना उपस्थित राहावे असे आवाहन गोंदिया व सालेकसा तहसिलदार अरविंद हिंगे व प्रशांत सांगडे यांनी केले आहे.