24.5 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home Featured News रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठानच्यावतीने वारक-यांचा सत्कार

रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठानच्यावतीने वारक-यांचा सत्कार

0
28

पुणे,दि.19- संतश्रेष्ठ माऊली विठूमाऊलीच्या भेटीसाठी पंढपूरकडे प्रस्थान झालेली संत तुकाराम व ज्ञानेश्वर माऊलीची पालखी रविवारला पुण्यनगरीत दाखल झाली असून रामकृष्णहरी कृषि प्रतिष्ठानच्या वतीने श्रीकांत महाराज ठाकूरबुवा(परभणी)यांच्या दिंडी क्र.16 रथामागे असलेले वारकरी, तंबू प्रधान,वारक-यांचा सत्कार, भोजन आणि वृक्षारोपन कार्यक्रम घेण्यात आला. येथील भिक्षकरी सेवा केंद्र.आर.टी.ओ.समोर.दत्त मंदिराजवळ फुलेनगर येथे  वारक-यांना रामकृष्ण हरी कृषि प्रतिष्ठानच्या वतीने राहोटी (तंबू) वाटप  जेष्ठ लेखिका कवीयत्री प्राचार्य सौ.ज्योषनाताई चांदगुडे,सामाजिक कार्यकत्या सौ.प्रितीताई धापटे.प्रतिष्ठानच्या सचिव सौ.मिरा चिकणे देशमुख.ह.भ.प. श्रीकांत महाराज ठाकूरबुवा आणि हरी चिकणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.सोबतच स्विकार केंद्राच्या कार्यालयाजवळ उपायुक्त रवी पाटील,उपजिल्हाधिकारी सुधिर साळवे,प्रतिष्ठनच्या सचिव मिरा चिकणे देशमुख.ह.भ.प.श्रीकांत महाराज, प्राचार्य ज्योत्स्नाताई चांदगुडे.सामाजिक कार्यकर्त्या प्रितीताई धापटे, हरी चिकणे व वारकरी बांधव उपस्थित होते.

blank