25.1 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ म्हाडा वसाहतीतील देहव्यापार अड्डयावर धाड

म्हाडा वसाहतीतील देहव्यापार अड्डयावर धाड

0
30

भंडारा,दि.19 : शहरातील प्रसिद्ध म्हाडा वसाहतीत मागील आठ वर्षांपासून सुरू असलेल्या एका देहव्यापार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा घातला. या कारवाईत देहव्यापर चालविणाऱ्या महिलेसह सहा जणांना अटक केली. यात देह विक्री करणाऱ्या नागपूरच्या दोन महिलांचा समावेश आहे.निशा (४३) रा. रजनीनगर खात रोड भंडारा ही देहव्यापार करणारी महिला असून अटक करण्यात आलेल्या पुरूषांमध्ये महेंद्र जागनाडे (२९), शुभम रामदास शेंडे (२१), रूपेश राजूजी राऊत (२२) सर्व रा. लावेश्वर ता. भंडारा यांचा समोवश आहे. तर देह विक्री करणाऱ्या दोन्ही महिला या नागपूरच्या असून त्या ३० वर्षांच्या आतील आहेत. त्यातील एक विवाहित तर दुसरी अविवाहित आहे.

भंडारा शहरातील खात रोडवरील म्हाडा वसाहतीत एक घर भाड्याने घेऊन निशा ही महिला या व्यवसायात मध्यस्थीची भूमिका निभविणाऱ्या एका इसमासह या घरी राहत होती. या दोघांनी मागील आठ वर्षांपासून या उच्चभू्र वसाहतीत देहव्यापार सुरू केला होता. परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. नागरिकांनी तक्रार दिली होती. निशा हा व्यवसाय करण्यासाठी दरवेळी जागा बदलत असल्याने पोलिसांना कारवाईत यश आले नाही. दरम्यान प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या घरी आज मध्यरात्री छापा घालून ही कारवाई केली. या कारवाईत व्यापार करणाऱ्या महिलेस देहविक्री करणाऱ्या नागपूरच्या दोन महिला व इसमांना अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मि नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.या पथकात पोलीस कर्मचारी अरूण झंझाड, रेहपाडे, रोशन गजभिये, बबन अतकरी, कौशिक गजभिये, रमाकांत बोंद्रे, स्रेहल गजभिये, योगिता जांगळे यांचा समावेश होता. या कारवाईत मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह साहित्य जप्त केले. यात चार आरोपींचे चार मोबाईलही पोलिसांनी जप्त केले आहे. सोमवारला बेला येथील एका देहव्यापार अड्ड्यावर छापा घातला होता. या कारवाईत देहव्यापार करणारी एका महिला, देहविक्री करणारी महिला व पुरूष अशा तिघांना अटक केली होती. या कारवाईनंतर आठवड्याभरातच ही दुसरी कारवाई असल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहे.