‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’साठी निधी मोहीम राबवणार

0
7
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गांधीनगर- गुजरातेत ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ साकार करण्यासाठी भारतीय अमेरिकी डॉक्टरने निधी उभारण्यास पुढाकार घेतला आहे. २ लाख ५० हजार अमेरिकन डॉलर्स उभारण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. सरदार वल्लभभाई पटेलांचा भव्य पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ नावाने उभारण्यात येणार आहे.

शिकागो येथील डॉ. इंद्रजित जे. पटेल निधी उभारण्यासाठी नरेंद्र मोदींची प्रतिमा असलेली चांदीची नाणी विकणार आहेत. निधी उभारण्याच्या मोहिमेअंतर्गत स्टॅच्यू ऑफ युनिटीविषयी जनजागर करणार असल्याचे पटेल यांनी सांगितले. प्रवासी भारतीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला इंद्रजित पटेल आले होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

निधी मोहिमेचे स्वरूप : निधीदात्यांनी १ किलो चांदी द्यावी, त्या बदल्यात त्यांना मोदींची प्रतिमा असलेली ५० नाणी देण्यात येतील. ही ५० नाणी त्याने विकावीत व त्यातून उभारलेला पैसा स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी द्यावा. ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी सरदार पटेलांच्या जयंतीदिनी मोदींनी या प्रकल्पाची घोषणा केली होती.