पोवार ईरा व चक्रवती राजाभोज जयंती समारोह रविवारी

0
14

गोंदिया- राष्ट्रीय पोवार क्षत्रीय महासभा द्वारा संचालित क्षत्रीय राजाभोज पोवार सांस्कृतीक पर्यटन केंद्र सडक अर्जुनीच्यावतीने राजाभोज नगरी चिरचाडीरोड डव्वा येथे पोवारी ईरा २०१५ कार्यक्रम व चक्रवती राजाभोज जयंती समारोहाचे आयोजन रविवार १ फेबु्रवारी रोजी करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता राजाभोज qदडीने करण्यात येणार असून या qदडीचे उद्घाटन बालाघाटचे खासदार बोधqसग भगत यांच्या हस्ते राष्ट्रीय राजाभोज स्मारक समितीचे अध्यक्ष कन्हैयालाल बोवाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. राजाभोज qदडीचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला पोवार महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गुलाब बोपचे, कैलास हरिणखेडे, विनोद हरिणखेडे, भोजराज बिसेन, उमेश देशमुख, आय.डी.पटले, गुड्डू बोपचे, कुणाल बिसेन, प्रदीप कोल्हे, संदिप बघेले, केतन तुरकर, पंकज पटले आदी मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२ वाजता क्षत्रीय राजाभोज तैलचित्राचे पूजन व समारोहाचे उद्घाटन भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार नाना पटोले यांच्या हस्ते राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या समारोहाचे स्वागताध्यक्ष तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले असून विशेष अतिथी म्हणून आमदार बाळा काशिवार, आमदार संजय पुराम, जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, उपाध्यक्ष मदन पटले, माजी आमदार हेमंत पटले, खोमेश रहांगडाले, जगदीश येडे, प्रकाश रहांगडाले, विजय पारधी, चेतन भैरम, डी.डी. पटले, यु.टी. बिसेन, राजलक्ष्मी तुरकर, सिताबाई रहांगडाले, नरेंद्र तुरकर, रेखलाल टेंभरे व देवराम रहांगडाले उपस्थित राहणार आहेत.
दुपार २ वाजता आयोजित राष्ट्रीय पोवार क्षत्रीय महासभा संमेलनाच्या अध्यक्षस्थानी माजी राष्ट्रीय अध्यक्ष इंजि. टी.डी. बिसेन राहणार आहेत. उद्घाटक म्हणून महासचिव मुरलीधर टेंभरे व स्वागताध्यक्ष म्हणून प्रा.एच.एच. पारधी राहणार आहेत. पाहुणे म्हणून नलीनजी शहारे, पी.जी. कटरे, भुपेश तुरकर, भुमेश्वर चव्हाण, राजु पटले, डी.टी.रहांगडाले, डी.आय.कटरे, के.बी. चौधरी, राजु येडे, अरqवद बिसेन, राजेश रहांगडाले, भरत बोपचे, डॉ. उमेंद्र चौधरी, बबलू पटले उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमा दरम्यान पोवार समाजातील सांस्कृतीक कार्यक्रमाची झलक आणि पोवारी फोक ऑकेस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. समाजबांधवांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष विलास चव्हाण, सचिव सुदाम पटले व संयोजक लिलेश रहांगडाले यांच्यासह आयोजन समितीने केले आहे.